Top News देश

‘शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-47 घेऊन फिरत आहेत’; ‘या’ भाजप खासदाराचा दावा

नवी दिल्ली | केंद्राने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन चालू आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि केंद्र सरकार आपल्या निर्णयावर त्यामुळे अनेक बैठका होऊनही कोणताही तोडगा निघाला नाही. अशातच भाजपच्या राजस्थानमधील खासदार जसकौर मीणा यांनी अजब दावा केला आहे.

शेतकरी आंदोलनात दहशतवादी एके-47 घेऊन फिरत आहेत. तेथे बसलेले खलिस्तानी आहेत, असं जसकौर मीणा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष आहेत. त्यांना देशात बदल घडवायचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी कायदे आणले असल्याचं मीणा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी शेतकरी आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मागे काही दिवसांपुर्वी आंदोलनातील शेतकरी जेवण करताना खात असलेल्या नॉन-व्हेज जेवणामुळे बर्ड फ्लू पसरत असल्याचं एका भाजप आमदाराने म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

भाजपने बदललं ड्रॅगन फ्रूटचं नाव, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलं ‘हे’ नवीन नाव!

“भारतीयांनो खरा संघ येतोय तुम्हाला तुमच्याच घरात पराभूत करायला, सतर्क रहा”

‘माझे वीजबिल, मलाच झटका…; वीजपुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयावरुन भाजपची सरकारवर टीका

गांजाचा वापर करुन कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकतं; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी, कधी?’, शिवसेनेचा मोदींना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या