बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताच्या ‘या’ स्टार गोलंदाजाचीही पडणार विकेट; कोण आहे लाईफ पार्टनर?

नवी दिल्ली | बाॅलिवूड कलाकारांप्रमाणेच भारतीय क्रिकेटर्सचा लग्न सोहळा नेहमी चर्चेेचा विषय असतो. काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूची विकेट पडली आहे.

भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या चालू असलेल्या इंग्लंंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहने अचानक सुट्टी मागितली आहे. बुमराहने बीसीसीआयकडे सुट्टीसाठी अर्ज केला आहे. बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यासाठी त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे, अशी माहिती क्रिकट्रॅकरने दिली आहे.

मात्र, बुमराहच्या जीवनसाथीचं नाव अद्याप समोर आलं नाही. अधिकृतपणे या लग्नसोहळ्याची माहिती देखील दिली गेलेली नाही. याॅर्करच्या दिग्गजाची विकेट कोणी काढली अश्या चर्चा बुमराहच्या चाहत्यांमध्ये देखील रंगल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंड विरूद्धच्या चार टेस्टच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. जागतिक टेस्ट चाॅम्पियनशीपची फायनल खेळण्यासाठी भारताला पुढचा सामना जिंकावा किंवा ड्राॅ करावा लागेल. त्यानंतर न्यूझीलंडशी सामना दोन हात करायची संधी मिळू शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू संघाबाहेर असल्याने भारतीय संघाची चिंता वाढू शकते.

थोडक्यात बातम्या-

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

तो व्यक्ती कोण?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या किस्स्याची जोरदार चर्चा

फडणवीसांना आपल्यावर असलेला विश्वास पाहून अजित पवारांना हसू अनावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More