बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जसप्रित बुमराहचं ‘शतक’! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

मुंबई | सध्या इंग्लंडच्या ओवल मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्या चौथी कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात सध्या भारताने मजबूत पकड बनली. भारताच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी मोठी खेळी करत इंग्लंडला भलं मोठं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आता भारताचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहने दमदार कामगिरी केली आहे.

सामन्याच्या 65वं षटक टाकण्यासाठी कर्णधार कोहलीने जसप्रित बुमराहने हातात चेंडू सोपवला. बुमराहने जबरदस्त याॅर्कर टाकून इंग्लंजच्या ऑली पोपला विकेट काढला. त्याचबरोबर त्याने आपल्या करियरमध्ये 100वा विकेट घेतला आहे. केवळ 24 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात भारताकडून खेळताना बुमराह सर्वात जलद 100 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताचा माजी कर्णधार कपिल देवने 25 सामन्यात 100 विकेटचा टप्पा पार केला होता. तर इरफान पठाणने 28 सामन्यात ही कामगिरी केली आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात बुमराहने दमदार कामगिरी करत दोन बोल्ड काढले. ऑली पोपचा विकेट काढल्यानंतर जाॅनी बेअरस्टोला तेखील बुमराहने माघारी पाठवले. नुकत्याच आलेल्या वृत्तानंतर 198 धावांवर इंग्लंडच्या 8 विकेट गेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“जितेंद्र आव्हाड तुम्हीही आता बॅग भरा”; किरीट सोमय्यांच्या हाताला नेमकं लागलंय काय???

प्रेयसीने न सांगता लग्न उरकल्याने तरूण गेला टेकडीवर अन्….; पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल!

अक्षय कुमारच्या घरातील ‘या’ व्यक्तिची प्रकृती खालावली; ICUमध्ये दाखल!

“मेहबूबसारख्या बलात्काऱ्यांना कधीही उठा काहीही करा अशी मूभा दिलीय”

“राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More