Top News खेळ

‘तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…’; जसप्रीत बुमराह झाला भावूक!

मुंबई | भारतीय संघाने कांगारूंना पराभवाची धूळ चारून मालिका खिशात घालत ऐतिहासिक विजय मिळवला. सर्व संघातील खेळाडू आनंदी आहेत. मात्र भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह मात्र काहीसा दु:खी आहे. बुमराहने एक भावनिक ट्विट केलं आहे.

इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू मला शिकवलीस त्यासाठी तुझे खूप आभार, माली, असं जसप्रीत बुमराहने म्हटलं आहे.

मुंबईच्या संघातील बुमराहचा सहकारी गोलंदाज लसिथ मलिंगाने  फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बुमराहने भावनिक ट्विट केलं आहे.

दरम्यान, बुमराह संघात नवीन आला असताना मलिंगा संघाचा प्रमुख गोलंदाज होता. सराव सत्रात मलिंगाच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे बुमराहला आपल्या गोलंदाजीची धार वाढण्यास मदत झाली.

 

थोडक्यात बातम्या-

‘आई बहिणीवरून त्यांनी वडिलांना शिव्या दिल्या पण…’; वडिलांच्या आठवणीत भरत जाधवची भावूक पोस्ट

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

एअरहॉस्टेस गँगरेप आणि हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, ही धक्कादायक माहिती आली समोर

“या तीन पक्षांची तोंडं तीन दिशेला आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष”

“आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या