खेळ

BCCI कडून जसप्रीत बुमराहचा सन्मान; दिला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेचा पाॅली उम्रीगर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) बीसीसीआयने रविवारी याबाबतची घोषणा केली. बुमराहला 2018-19 या वर्षासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

बुमराह आपल्या कारकिर्दीत सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने प्रतिष्ठेचा पाॅली उम्रीगर पुरस्कार देऊन बुमराहला सन्मानित केले. बीसीसीआयकडून रविवारी वार्षीक पुरस्कारांची घोषणा झाली.

जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण करणारा जसप्रित बुमराह आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल फलंदाज आहे. भारतीय संघाने मागिल वर्षी ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात जाऊन कसोटी सामन्यात पराभव केला होता. या विजयात बुमराहचा मोठा वाटा होता.

विशेष म्हणजे या पुरस्कारांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहील आणि हिटमॅन रोहित शर्मा याचा समावेश नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

“जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं त्याचंच पालन आम्ही करतोय”

हार्दिक पांड्याला धक्का; फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्याने संघातील स्थान गमावलं

जावई बापूंनी जरा डोंबिवलीकडे लक्ष द्यावे; मनसे आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या