Top News राजकारण

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन

नवी दिल्ली | देशाचे माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचं आज निधन झालं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय तसंच अर्थमंत्रालयाची धुराही सांभाळली होती.

दीर्घकाळापासून जसवंत सिंह आजारी होते. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मोदी म्हणाले, जसवंत सिंह यांनी प्रथम एक सैनिक म्हणून परिश्रमपूर्वक देशाची सेवा केली. आणि नंतर राजकारणात येऊन पूर्ण मेहनतीने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला दुःख झालंय.

महत्त्वाच्या बातम्या

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण

…तोपर्यंत ‘काँग्रेस’चा संघर्ष सुरुच राहणार- बाळासाहेब थोरात

आनंदाची बातमी: राज्यात 10 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या