कोल्हापूर | एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. गीतकार जावेद अख्तर यांनीही वारीस पठाण यांच्यावर सडकून टीका केली आहे.
बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस? एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल, असा सल्ला जावेद अख्तर यांनी वारीस पठाण यांना दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
15 करोडचा ठेका तुम्हाला कोणी दिला? आशा लोकांपासून सावध राहीलं पाहिजे, असं म्हणत अख्तर यांनी वारीस पठाण यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एकत्र राहण्याच्या काळात असं बोलत असाल तर तुम्ही 15 करोडच राहाल, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहे, असं चिथावणीखोर वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथल्या जाहीर सभेत केलं होतं. त्यावरुन देशभरात वाद उफाळला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
दगडाला उत्तर दगडानं, तलवारीला उत्तर तलवारीनं; वारिस पठाणांना ‘मनसे’ इशारा
उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींची घेणार भेट; चर्चांना उधाण
महत्वाच्या बातम्या-
‘माझं ऐकायला शिका…’; भरसभेत मध्येच बोलणाऱ्या दारुड्याला अजित पवारांचा सल्ला
इतकी लपवा-छपवी लहान मुलंही करत नाहीत, जितकी मोदी सरकार करत आहे- चाकणकर
शिवजयंती साजरी न करणाऱ्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यावर कारवाईची ‘शिवसंग्राम’कडून मागणी
Comments are closed.