बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचा कधीही अफगाणिस्तान होणार नाही, हिंदू जगातील सर्वात…’; जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | प्रसिद्ध गीतकार, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांमागे जावेद अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबान्यांसोबत केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अशातच पुन्हा एकदा हिंदूंबाबत भाष्य केलं आहे.

भारताचा कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण भारतातील लोक हे कट्टरवादी नाहीत ते मध्यमवर्गीय भूमिका स्वीकारतात नाहीतर मध्यममार्ग हा त्यांच्या डीनएमध्ये आहे, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकाबाबत पडदा पद्धतीविषयी किंवा इतर प्रतिगामी प्रथांविषयी नेहमी आवाज उठवला आहे. गेल्या वर्षांमध्ये मी काय केलं हे याबद्दल लोकांना माहित नाही आणि मी इतका महत्त्वाचा माणूस नाही की माझ्याबद्दल प्रत्येकाला माहिती असायला हवं, असंही जावेद अख्तर म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलीन या मुख्यमंत्र्यांइतकेच लोकप्रिय आहेत, असं वक्तव्य जावेद अख्तर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोंडेत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More