“मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क असल्याने हिंदू जळतात”

Javed Akhtar | बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता नुकतंच त्यांनी समान नागरी कायद्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी या कायद्याला पाठिंबाही दर्शवला आहे.

फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणं योग्य नसल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत बोलून दाखवलं आहे. त्यामुळे सध्या जावेद अख्तर यांचीच चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले जावेद अख्तर?

मी स्वतः समान नागरी कायद्याचं पालन करतो. पण, फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणं योग्य नाही. चर्चा करुन काही नियम समान रुपाने सर्वांसाठी लागू करण्यात यायला हवेत. मात्र, मुस्लिमांना बहुविवाह करता येऊ नये म्हणून समान नागरी कायद्याला पाठिंबा देत असाल तर हे चुकीचं आहे, असं जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी म्हटलं आहे.

तसंच पुढे ते म्हणाले की, मुस्लिमांना चार बायका ठेवण्याचा अधिकार आहे म्हणून इतर लोकं जळतात. कायदा लागू करण्यासाठी हेच एक कारण आहे का? जर तुम्हाला देखील हा हक्क दिला गेल्यास काही अडचणी येणार नाहीत, असं म्हणत जावेद अख्तर यांनी हिंदू विवाह पद्धतीवर मोठं वक्तव्य केलं.

“अनेक हिंदूंनी दोन लग्न केले आहेत”

हिंदूमध्ये बरेच लोक बेकायदेशीररित्या दोन लग्न करतात. त्यामुळे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी समान कायदा असायला हवा. मी माझ्या मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले आहेत, असं देखील जावेद अख्तर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी प्रतिसवाल करत म्हटलं की, “तुम्ही तुमच्या मुलीला संपत्तीमध्ये समान हक्क दिलाय का?, नाही दिला तर मग शांत राहा.”

सध्या जावेद अख्तर यांच्या विधानाचीच चर्चा होत आहे. ते (Javed Akhtar) नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असतात. त्यांनी आता समान नागरी कायद्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यावर आता काय प्रतिक्रिया उमटतील, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

News Title- Javed Akhtar big statement on uniform civil code

महत्त्वाच्या बातम्या –

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा