Top News विधानसभा निवडणूक 2019

जावेद अख्तर यांची मोदी सरकारवर टीका; म्हणतात…

Loading...

मुंबई | प्रसिद्ध कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रशासनावर सडकून टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’चे उद्घाटन जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.

देश म्हणजे ट्विटर नाही. देशाचे निर्णय ट्विटरवर करू नका,  अशा परखड शब्दात जावेद अख्तर यांनी प्रशासनावर तुफान टोलेबाजी केली.

Loading...

भारतात सध्या धार्मिक उन्माद माजला आहे. त्यामुळे देशाचे राजकारण हुकूमशाही आणि धर्मांध प्रवृत्तीच्या दिशेने जात आहे. परंतु देशात हजारो वर्षे जुनी सभ्यता टिकून असल्याने लोकशाही जिवंत आहे. आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, असं म्हणत जावेद अख्तर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

जगभरात सध्या मंदी सदृष्य वातावरण आहे. या आर्थिक गोंधळाचा लवकरच भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत योग्य आर्थिक उपाय योजना करणे गरजेचे आहे. परंतु देशाचे पंतप्रधान इतर देशांचे दौरे करण्यात व्यस्त आहेत, असंही जावेद अख्तर म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या