Javed Akhtar | जावेद अख्तरांनी लाहोरला जाऊन पाकिस्तानला झापलं

नवी दिल्ली | प्रसिद्ध पटकथा लेखक, गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी सरकारविरोधात देखील काही वक्तव्य केली आहेत. ते त्यांच्या परखड बोलण्याने चर्चेत येत असतात. सध्या त्यांनी पाकिस्तानात एक वक्तव्य केलं आहे. ज्याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

पाकिस्तानातील (Pakistan) लाहोर (Lahore) या शहरात एका कार्यक्रमास प्रसिद्ध गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलं. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईमधील (Mumbai) 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख देखील केला आहे. तसेच त्यांनी भारताचं गुणागान देखील गायलं.

आम्ही मुंबईचं लोक आहोत. आमच्या देशावर कसा हल्ला झाला आम्ही पाहिलं आहे. ते लोक नार्वे (Norway ) किंवा इजिप्तमधून (Egypt) आलं नव्हते तर ते तुमच्या अर्थात पाकिस्तानचं लोक आहेत. ते आजही तुमच्या देशात मुक्तपणे फिरत आहेत. या संबधित आम्ही भारतातील लोकांनी तक्रार केली तर तुम्हाला त्याचं वाईट वाटू नये, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

या वक्तव्यान भारतात अख्तर याचं कौतुक केलं जात आहे. याच कार्यक्रमावेळी बोलताना आम्ही नुसरत फतेह अली खान(Fateh Ali Khan), मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झालं नाही, असा टोमणा अख्तर यांनी लगावला.

अख्यर यांना एका तरुणाने प्रश्न विचारला, दोन्ही देशातील समस्या सोडविण्यासाठी काय करणं गरजेचं आहे यासाठी तरुणाईनं पुढं यावं असं आपल्याला वाटत का?. तेव्हा अख्तर म्हणाले, ”शेवटी सत्तेत असलेल्या लोकांच्याच हातात सत्ता असते. तुम्ही कीतीही प्रयत्न केले तरी एक घटना तुमचे सर्व प्रयत्न उध्वस्त करेल. यासाठी दोन्ही बाजूंच्या लोकांनी प्रयत्न केला पाहिजे”

महत्त्वाच्या बातम्या