“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले

Javed Akhtar | ज्येष्ठ गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहत असतात. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात. अशात त्यांचं एक ट्वीट चर्चेत आलंय. या ट्वीटवरून सोशल मीडियावर घमासान झालं आहे. नुकतंच एका युझरने त्यांच्यावर ‘गद्दाराचा मुलगा’ अशी टीका केली.

या युझरच्या टीकेला जावेद अख्तर यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांची ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे.त्यांनी संबंधित युझरला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आपल्या वडिलांवर केलेल्या टिकेवरून जावेद अख्तर (Javed Akhtar) संतापले आहेत.

‘गद्दाराचा मुलगा’ म्हणत युझरने केलं जावेद अख्तर यांना टार्गेट

झालं असं की, जावेद अख्तर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या शक्यतेवर एक ट्वीट केलं होतं. ‘भारतीय नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तो अभिमान असेल. पण जो बायडेन यांच्यात आणि माझ्यात एक समान गोष्ट आहे. आम्हा दोघांना अमेरिकेचे पुढचे अध्यक्ष बनण्याची समान संधी आहे’,असं ते ट्वीट होतं.

एका सोशल मीडिया युझरने याच ट्वीटवर त्यांना प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या राष्ट्राची विभागणी करणारा गद्दाराचा मुलगा’ अशा शब्दांत या युझरने जावेद अख्तर यांना टार्गेट केलं. या टिकेलाच पुढे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं.

जावेद अख्तर यांनी युझरला सुनावले खडेबोल

‘तुम्ही पूर्णपणे अज्ञानी आहात की पूर्ण मुर्ख आहात, हे ठरवणं कठीण आहे’, अशा शब्दांत त्यांनी या युझरला फटकारलं. तसंच पुढे ते म्हणाले की, “1857 पासून माझं कुटुंब स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत आहे आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास आणि काळ्या पाण्याची शिक्षासुद्धा भोगली आहे. तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रज सरकारचे तळवे चाटत होते.”, अशी प्रतिकीय जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी संबंधित युझरला दिली.

दरम्यान, जावेद अख्तर हे गीतकार आणि कवी जान निसार अख्तर यांचे पुत्र आहेत.त्यांचे वडील हे फाळणीपूर्वीच्या ब्रिटिशांच्या काळात भारतातील प्रगतीशील लेखक चळवळीत सक्रिय सहभागी होते. तर त्यांचे आजोबा फझल-ए-हक खैराबादी हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध 1857 च्या बंडात भाग घेतला होता. खैराबादी यांना अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Javed Akhtar tweet

News Title –   Javed Akhtar Response To A Social Media User  

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईत पावसाचं थैमान! ‘या’ भागांना बसला सर्वाधिक फटका, शाळा-महाविद्यालयातही पाणीच पाणी

“सरकार कमिशनखोरीत अडकलंय, पहिल्याच पावसात यांनी मुंबई तुंबून दाखवली”

ब्रेकिंग! पुण्यात भरधाव वेगाने 2 पोलिसांना चिरडलं; एकाच मृत्यू तर…

आज राज्यात कसं असणार हवामान? ‘या’ भागाला यलो अलर्ट

या राशीच्या व्यक्तींनी नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी