बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची कमी पडल्यानेही काहींना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना रूग्णांसाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. अलिकडे राज्यातील परिस्थिती काहीशी सुधारत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारची तयारी नव्हती मात्र तरीही काही प्रमाणात आता आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे.

राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी कौैतुक केलं आहे. तर केंद्र सरकारला नाव न घेता टोला हाणला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. तरी देखील सरकार आणि बीएमसी जबरदस्त क्षमतेने काम करत आहेत. इतरांनीही त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे ते ट्रोल झालेले पाहायला मिळाले आहेत.

दरम्यान,अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांना यासाठी ट्रोल केले. ‘महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत, सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशात महाराष्ट्राकडून काय शिकायचं?’ असा सवाल एका नेटकऱ्याने त्यांना केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’चा कोरोनाबद्दल धक्कादायक दावा, मोदी सरकारवर जोरदार टीका

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत फॅमिली डॉक्टर्सवर ही मोठी जबाबदारी, सरकारचा मोठा निर्णय

चिंताजनक! शनिवारी देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद; रूग्णसंख्याही वाढली

‘या’ राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊनही वाढवला

“राज्याला पुरेशी लस कशी मिळेल यासाठी केंद्राला पत्र जरूर लिहावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More