“जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है”
मुंबई | देशातील पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजप नेते शिवसेनेवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा येथे निवडणूक लढवली. मात्र, याठिकाणी शिवसेनेला खातही उघडता न आल्याने भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
जावेद भाई अपना हार्मोनियम पॅक कर लो, सलीम भाई को गाना सुनना है, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. मोहित कंबोजने शिवसेना खासदार संजय राऊत यांचा हार्मोनियम वाजवतानाचा फोटो ट्विट केला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने संजय राऊत यांनी हार्मोनियम वाजवला होता.
गेल्या काही दिवसांपासून मोहित कंबोज संजय राऊत यांचा उल्लेख जावेद तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा उल्लेक सलीम असा करत आहेत. संजय राऊतांनी हार्मोनियम पॅक करावे, असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला आहे. मोहित कंबोज यांचे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, शिवसेनेने उत्तर प्रदेशात 37 उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही ठिकाणी शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. कोणत्याही निवडणुकीत पराभव हा अंतिम नसतो. लढाई संपली असा अर्थ होत नाही. उत्तर प्रदेशात आम्ही जिथे लढलो ती आमची सुरूवात होती. आम्ही लोकांसाठी काम करत राहु, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला गंभीर इशारा, म्हणाले ’11 तारखेला…’
Wheather Update : पुढील 5 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस
“ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची….”; आशिष शेलारांचा हल्लाबोल
7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ
सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही एक्स अचानक समोरासमोर अन्…, पाहा ‘तो’ व्हिडीओ
Comments are closed.