बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब (Hair Stylist Javed Habib) त्यांच्या एका कृत्यामुळे वादात आले आहेत. एका सेमिनारमध्ये जावेद हबीब एका महिलेच्या केसात थुंकले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर जावेद हबीब यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता जावेद हबीब यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.

मुझ्झफरनगर येथील एका सेमिनारमध्ये हा प्रकार घडला आहे. जावेद हबीब महिलेची हेयर स्टाईल करत होते. यावेळी जावेद हबीब यांनी महिलेच्या केसात थुंकले. महिलेचे केस कोरडे आहेत असं म्हणत त्यांनी तिच्या केसात थुंकले. शिवाय पाण्याची कमी असल्यास थुंकूनही काम होऊ शकतं असंही सांगितलं.

जावेद हबीब यांच्या त्या कृत्यानंतरही सेमिनारमधील महिलांना टाळ्या वाजवल्याचं दिसतं आहे. शिवाय जावेद हबीब केसात थुंकल्यानंतरही ती महिला तशीच बसून राहिलेली दिसत आहे. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने मुझ्झफरनगर येथे पोलिसात तक्कार दिली आहे. हे प्रकरण वाढत असल्याचं दिसताचं हबीब यांनी सोशल मीडियावरून या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.

दरम्यान, जावेद हबीब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. “आमचे सेमिनार बराच वेळ चालतात. तरीही कोणाला वाईट वाटले असेल. तर मनापासून क्षमस्व”, असं जावेद हबीब यांनी माफी मागताना म्हटलं आहे. गुरुवारी हबीब यांनी माफीचा व्हिडीओ इन्साग्रामवर पोस्ट केला होता.

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून मिळणार बूस्टर डोस, नवी नियमावली जाहीर

“जगाची चुकीची बाजू वर…”, अमृता फडणवीस ट्विटमुळे पुन्हा चर्चेत

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, मोफत वडापाव खा’; ‘या’ ठिकाणी राबवला जातोय अनोखा उपक्रम

“ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, राष्ट्रवादीला मात्र…”, भर कार्यक्रमात रोहित पवारांचा पंकजांना टोला

‘माई, तुझ्या प्रेमाला…’, गुगलनं अनोख्या पद्धतीनं वाहिली श्रद्धांजलीp

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More