Top News तंत्रज्ञान देश

ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!

Photo- Youtube/Jawa Motorcycles

नवी दिल्ली |  भारतीय ग्राहकांसाठी क्लासिक रेट्रो बाइक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने चांगल्या गाड्या बाजारात आणल्या आहेत. कंपनीच्या रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०, थंडरबर्ड, मेटेऑर, बुलेट ह्या गाड्यांचे तरुणांमध्ये विशेष आकर्षण आहे. रॉयल एनफिल्डने आता नवीन गाडी ‘२०२१ हिमालयन’ला नुकतंच विशेष फिचर्ससह लॉन्च केलं आहे.

रॉयल एनफिल्डची बाजारातील प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी जावानेही आपल्या नवीन रुपातील गाडीचे ‘जावा ४२’चे पहिले अधिकृत टीझर प्रदर्शित केले आहे. लवकरच गाडी बाजारात येण्याचा अंदाज आहे. भारतीय ग्राहकांमध्ये जावाच्या गाड्यांना चांगलीच पसंती असून त्याच्या खरेदीतही चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

चेकोस्लोवाकियन बाइक निर्माता कंपनी खूप वेळानंतर भारतीय बाजारात नवीन सुरुवात करत आहे. महिंद्रा आणि महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिद्रा यांनी भारतात या कंपनीची मालकी घेतली आहे. २०१८ च्या शेवटी कंपनीने जावा, जावा ४२, जावा पेराक ला लॉन्च केले होते. त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

जावा कंपनीच्या क्लासिक आणि जावा ४२ ह्या गाड्यांची प्रत्यक्ष स्पर्धा रॉयल एनफिल्डने सध्या लॉन्च केलेली क्लासिक ३५०, मेटेऑर ३५० या गाड्यांसोबत असणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘२०२१ जावा ४२’ वायर्ड स्पोकच्या जागी ट्यूबलेस टायर्स आणि अलॉय व्हील्समध्ये टेस्टिंग करताना दिसली होती. ट्युबलेस टायर आधीपेक्षा चांगले असणार आहेत. जावाने एग्जॉस्ट आउटलेट्स, रियर स्प्रिंग्स आणि फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क्सला ब्लैक ट्रीटमेंट दिली आहे. जावा कंपनीने रेट्रो डिजाइन जुन्या पद्धतीनेच ठेवले आहे.

या गाडीत 293चं सिंगल सिलेंडर फ्यूल इंजेक्टेड लिक्विड कूल्ड इंजन दिले जाणार आहे.  हे २७bhp पॉवर मिळेल आणि २७.०५nm पीक टॉर्क तयार होईल. ६-स्पीड ट्रांसमिशन बॉक्स समाविष्ट असेल. जावा ४२ ची एक्स- शोरुम किंमत १.६३ लाख ते १.७२ लाख रुपये असणार आहे. या किमतीत थोडा बदल होऊ शकतो.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा

सचिनच्या मुलाचं काय होणार?; आज होणार महत्त्वाचा फैसला

‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या