तंत्रज्ञान

जावाची धमाकेदार तिसरी बाईक भारतात लाँच; जाणून घ्या किंमत…

मुंबई | महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने विकत घेतलेल्या जावा कंपनीच्या तिसऱ्या बाईकची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पहिल्या टप्प्यात दोन नव्याकोऱ्या बाईक भारतीयांसमोर आणल्यानंतर जावानं आता आपली पेरक बॉबर बाईक सादर केली आहे.

जावा पेरकची एक्स शोरुममधील किंमत १ लाख ९४ हजार ठेवण्यात आली आहे. पेरक ही बाईक हार्ले डेव्हिडसनचा लूक देते त्यामुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

जावानं याआधी आपली जावा आणि जावा ४२ या बाईक्स सादर केल्या होत्या. यांची किंमत अनुक्रमे १ लाख ६४ हजार आणि १ लाख ५५ हजार रुपये होती.

दरम्यान, वरील दोन बाईक्स सादर करतानाच जावाने आपल्या पेरक बाईक्सचा लूक ग्राहकांना दाखवला होता. तेव्हापासून अनेकजण या बाईकच्या भारतात सादर होण्याची वाट पाहात होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे १९४६ साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही बाईक पॅरिस मोटार शोमध्ये दाखवण्यात आली होती. त्यावरुन या बाईकची संकल्पना घेण्यात आली आहे.

जावा पेरकचे आणखी काही फोटो-

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या