बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नेहरू आणि वाजपेयी हे आदर्श नेते, सर्व पक्षांना आत्मपरिक्षणाची गरज”

नवी दिल्ली | राजकारण हे आदर्शवादावर चालत आलं आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर देशातील लोकशाही सुखाने नांदण्यासाठी देशाला मजबूत राजकारण्यांची गरज होती. ती मिळाल्याने आज आपली लोकशाही टीकली आहे.

सत्ताधारी आणि विरोधक हे नेहमीच एकमेकांवर टीका करताना पहायला मिळतात. लोकशाही टीकण्यासाठी विरोधक व सत्ताधारी यांना आपल्या कर्तव्याचं भान नेहमीच रहायला हवं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

गडकरी म्हणाले की, देशाचे माजी पंतप्रधान पंडीत नेहरू व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लोकशाहीसाठी आदर्श नेते आहेत. या दोघांनीही आपल्या आयुष्यात लोकशाहीच्या मुल्यांचा सन्मान केला. या दोन्ही नेत्यांचा आदर्श हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी घेतला पाहीजे. सक्षम विरोधक हा लोकशाहीचा आत्मा असतो, असंही गडकरी म्हणाले आहेत.

आज जे सत्तेत आहेत ते उद्या विरोधी पक्षात असतील. व आज जे विरोधी पक्षात आहेत ते उद्या सत्ताधारी होतील. म्हणून दोघांनीही आपल्या परिने या लोकशाहीचं महत्व जपलं पाहीजे. तसेच जे नुकतचं संसदेत घडलं त्याने मला दु:ख झालं आहे, असंही गडकरी म्हणाले आहेत. सरकार व विरोधी पक्ष या दोघांनीही आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं मतंही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पालघर दौरा रद्द!

याला म्हणतात मार्केटिंग, ‘या’ पठ्ठ्याचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेने केली ‘ही’ मोठी घोषणा

गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं; पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडा शर्यत संपन्न

तुमचा माझा पगार हा जनतेच्या घामाच्या पैशातून मिळतो याचं भान ठेवा…- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More