बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याने जवानाने केंद्रीय मंत्र्याला दिली जीवे मारण्याची धमकी!

नवी दिल्ली | कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. लोकांना उपचारासाठी बेड मिळत नाहीये. अनेकांना बेडसाठी वणवण फिरावं लागतंय. तर अनेकांचा बेड आणि वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. अशात  हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याच्या रागात जवानाकडून मंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे. रेवाडी जिल्ह्यात राहणाऱ्या भारतीय लष्करातील एका जवानाच्या कोरोनाग्रस्त लहान भावाला ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती. पण तो मिळालाच नाही.

जवानाने गुरुग्रामचे खासदार आणि केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रामपुरा पोलीस स्टेशनमध्ये या जवानाविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जवानाने ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्याने एक व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माझ्या लहान भावाला कोरोनाची लागण झाली आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे. मी रेवाडीत शोधलं पण एकाही ठिकाणी मला ऑक्सिजन सिलिंडर मिळाला नाही. गुरुग्राममधून मला 70 हजार रुपयांना ऑक्सिजन सिलिंडर घ्यावा लागला, असं जवानाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक

लाॅकडाऊनमध्ये नवदाम्पत्याची बुलेटवर सफर; पोलिसांनी पकडून केलं असं काही की… पाहा व्हिडीओ 

आता पेट्रोल पंपावर मिळणार ही सुविधा; इंडियन ऑईलने केली ही मोठी घोषणा

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना; मृत मुलाच्या आठवणीत आई चितेच्या राखेतच झोपते

“उपास-तापासाची ही वेळ नाही रोज अंडे, मटन खा, कोरोना झाल्यावर देव वाचवणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More