अक्कलकोट | अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूरच्या सीमेवर असणाऱ्या आचेगावचा ‘जय हिंद शुगर साखर’ कारखाना उसाचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या दारात देणार आहे. त्याचा पहिला चेक त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं म्हणत कारखान्याचे अध्यक्ष गणेश माने-देशमुख यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
अक्कलकोटमधल्या 60 टक्के उसाचं गाळप एकट्या ‘जय हिंद’मध्ये होतं. 2018 च्या गाळप हंगामात 2201 रूपये भाव देण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार पहिला हप्ता मार्च 2019 महिन्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला.
कारखान्याचा इतर खर्च बाजूला ठेवून कारखान्याने 2001 रूपयांचा दुसरा हप्ता लवकरात लवकर देण्याचा निर्णय कारखान्याकडून घेण्यात आल्याचं देशमुखांनी सांगितलं.
दरम्यान, एकीकडे उसाचा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागतात. अशात ‘जय हिंद’चा हा निर्णय अक्कलकोट भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळेप्रसंगी कर्ज काढू पण त्यांचं पुनर्वसन करू- चंद्रकांत पाटील
-सरकारनं पूरग्रस्तांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली त्याचं कौतुकच पण..- संभाजीराजे भोसले
‘आपला माणूस’ नाना पाटेकर पूरग्रस्तांच्या मदतीला; 500 घरं बांधून देणार
-राधा झाली सौमित्रसाठी बावरी…. दिला लग्नाला होकार
-महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…
Comments are closed.