देश

मुलीच काय मुलंही सुरक्षित नाहीत; जया बच्चन संसदेत भावुक

नवी दिल्ली | लहान मुलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पाॅस्को) सुधारणा करण्याबाबत राज्यसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळी बोलताना समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

आई-वडिलांना केवळ मुलींची चिंता असायची. मात्र आता आपली मुलंही सुरक्षित नाहीत असं त्यांना वाटतं, अशी चिंता जया बच्चन यांनी व्यक्त केली.

पाॅस्को कायद्यावरील चर्चेदरम्यान दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणाचा संदर्भ देताना जया बच्चन भावूक झाल्या.

दरम्यान, पाॅस्को कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार आता लहान मुलांवर अत्याचार केल्यास आणि दोषी आढळल्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतुद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या