Aishwarya Rai | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे संबंध आता टोकाला गेल्याचे म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं देखील म्हटलं जातंय. अशात ऐश्वर्याची (Aishwarya Rai) सासू जया बच्चन यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जया बच्चन या ऐश्वर्या राय हिच्याबद्दल एका शोमध्ये मोठे भाष्य करताना दिसल्या. “अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला कधीच सून मानले नाही. श्वेता बच्चन हिच्या लग्नानंतर मुलीची कमी सतत जाणवत होती. अभिषेकच्या लग्नानंतर ती कमी नक्कीच पूर्ण झाली. कारण, अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याला सून नाही तर मुलगी मानले.”, असं जया बच्चन म्हणाल्या आहेत.
जया बच्चन यांचा मोठा खुलासा
जया बच्चन यांचं हे विधान तसं जुनं आहे, मात्र आता ते चर्चेत आलं आहे. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाला श्वेता बच्चन कारणीभूत असल्याची देखील चर्चा आहे.श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहण्यास आल्याने ऐश्वर्याचे (Aishwarya Rai) कुटुंबासोबत मतभेद झाल्याचे म्हटले जात आहे.
इतकंच काय तर, ऐश्वर्याने अभिषेकसोबत घटस्फोट घेतला असून ती घटस्फोटानंतर माहेरी राहायला गेल्याचं देखील म्हटलं गेलं. ऐश्वर्या ही लेक आराध्या बच्चन हीच्यासोबत वेगळं राहत असल्याचं बोललं गेलं. मात्र, यावर ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केलं नाहीये.
श्वेता बच्चनमुळे ऐश्वर्याने सोडलं घर?
गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्याला कुटुंबापासून वेगळं पाहिल्या गेलं आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नात देखील ऐश्वर्या लेकीसोबत वेगळ्या गाडीत आली होती. तर, नुकतीच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली होती.तेव्हा विमानतळावर ऐश्वर्या हीला मुलगी आराध्या सोबत स्पॉट केलं गेलं. तेव्हा अभिषेक तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे ते वेगळे झाल्याच्या चर्चेला अजूनच हवा मिळाली.
ऐश्वर्या हीने अभिषेकसोबत 2007 साली संसार थाटला. विशेष म्हणजे यांचा विवाहसोहळा अत्यंत खास राहिला. पण, अभिषेकसोबत लग्न करण्याअगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याला डेट करत होती. हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि सलमान खान दोघेही लग्न करण्याच्या तयारीत देखील होते. पण, काही करणाने त्यांच्यात भांडण झाले. नंतर ऐश्वर्याचे (Aishwarya Rai) नाव हे विवेक ओबेरॉयसोबत देखील जोडले गेले. पण, तिने आयुष्याचा साथीदार म्हणून अभिषेक सोबत लग्न केले. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत.
News Title – Jaya Bachchan big revelation about Aishwarya Rai
महत्त्वाच्या बातम्या-
बच्चन कुटुंबात अजूनही कोल्ड वॉर सुरूच?, अमिताभ बच्चन यांच्या पोस्ट वेधलं लक्ष
पुणेकरांनो काळजी घ्या! झिका व्हायरसचा धोका वाढला, रूग्णसंख्या 52 वर
“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं
सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या