महाराष्ट्र मुंबई

“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”

पुणे | सरनाईकांच्या घरावर टाकलेल्या छाप्यातून काही साध्य होणार नाही. राज्यकीय नेत्यांना अशाप्रकारे त्रास देणं ही भाजपची जुनी सवय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल, असंही जयंत पाटील म्हणालेत. ते मावळमध्ये बोलत होते.

महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं भाजपकडून नेहमीच बोललं जातं. त्यामुळं त्यावर नेहमी प्रतिक्रिया द्यावी, असंही आता वाटत नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

महत्वाच्या  बातम्या-

“फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच”

‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’; प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे विनंती

‘आम्ही स्वप्न बघत नाही, थेट कृती करतो’; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या