Top News

देवेंद्र फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना चितपट करु- जयंत पाटील

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झालं आहे की मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यांना आम्ही चितपट करणार आहोत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाचही जागांवर महा विकास आघाडीचाच विजय होईल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उद्यापासून पुण्यातील 11 तालुक्यातून संयुक्त प्रचार सुरु करणार असल्याचं सांगितलं.

देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली म्हणून पदवीधरांसमोर मोठं संकट आहे. महावितरणचे 67 हजार कोटी 2014 नंतर फडणवीस सरकारकडून थकले आहेत. महाराष्ट्रावर आता संकट आलं आहे, मात्र भाजपमुळे मंत्रालय धोक्यात आलं, अशी टीकाही जयंत पाटलांनी यावेळी केली.

आम्ही लोकांना दिलासा देण्यासाठी वीज मंडळाला सक्षम केले पाहिजे असा आमचा विचार आहे. थकबाकीला वेग देऊन दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार सक्षम आहे, अशी ग्वाही जयंत पाटलांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक डिजीटलपद्धतीने होणार!

“पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी”

“शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली”

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या