अकोला | गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं, अशी बोचरी टीका मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केली आहे.
राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोटस होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
भाजप नेहमीच वेगवेगळे स्टेटमेंट देऊन सरकार पडण्याच्या धमक्या देत असते. जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यात त्यांना यश मिळत नाही. संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं नारायण राणे म्हणालेत.
येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय. तरी त्यांचं तेच पालुपद सुरू आहे. त्यामुळे राणेंच्या टीकेला गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असा टोलाही जयंती पाटील यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या-
भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, चंद्रकांत पाटील हे तर बावचळलेत- अजित पवार
“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”
आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!
‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं