बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात. यावरून  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी  मुंबईत कोरोना मृतांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. या ट्विटला जयंत पाटील यांनी रिट्विट करत फडणवीसांना खडेबोल सुनावलेत.

देवेंद्र फडणवीसजी आजच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविडचा प्रसार रोखण्याकरिता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल. आता मुख्य प्रश्न असा आहे कि योग्य कोण, मा. पंतप्रधान कि तुम्ही?, असा खोचक सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुमारे 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या गरजा पंतप्रधानांसमोर मांडल्याचं कळतंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

“देशात कोरोनामुळे 1 ऑगस्टपर्यंत दहा लाख लोकांचा बळी जाण्याची शक्यता”

“पदोन्नतीमधील 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या”

‘मला मनसुख हिरेन व्हायचं नाही’; व्यावसायिकाचा परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप

‘सगळे पुरूष एक सारखेच असतात’; शाहीदची पत्नी मीराने सांगितली त्याची वाईट सवय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More