मुंबई | जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार असून भाजपने नाराज होऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये, असा खोचक टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
कॅगने जलयुक्त शिवार योजनेच्या काही त्रुटींवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खुली चौकशी करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. या चौकशीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंना विचारा”
“तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही…”
राज्यातील सर्व ग्रंथालयं, मेट्रो सेवा उद्यापासून होणार सुरू
‘मुंबई दरवर्षी कशी तुंबते?’; गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र