आताची सर्वात मोठी बातमी; जयंत पाटलांचं निलंबन

नागपूर | राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. कारण जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी अपशब्द वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. 

विधानसभा अध्यक्षांना निर्लज्य म्हटल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली.

जयंत पाटील यांनी निर्लज्य शब्द विधानसभा अध्यक्षांना अनुसरूनच केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय.

सत्ताधाऱ्यांकडून आज दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली.

यावरून सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या गदारोळात जयंत पाटील यांनी निर्लज्य शब्दाचा उच्चार केल्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-