महाराष्ट्र सांगली

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

सांगली | धनगर आरक्षणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मागच्या सरकारने जे निष्कर्ष काढले त्याने धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी अडचणी तयार झाल्या आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

धनगर समाजावर जो अन्याय होत आहे. तो आता हाणून पाडावा लागणार आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी अहवाल देण्याचं सांगितलं होतं. त्यांनी जे निष्कर्ष काढले त्यातून धनगर समाजाला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. हा अहवाल म्हणजे वेळकाढूपणा होता, असं जयंत पाटील म्हणालेत.

धनगर समाजासाठी मागच्या सरकारने ज्या काही सवलतीच्या घोषणा केल्या त्या केवळ निवडणुकीच्या घोषणा ठरल्या. महाविकास आघाडी सरकार मात्र धनगर समाजाला जास्तीत जास्त सवलती कशा देता येतील यासाठी प्रयत्न करेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या काळातील विषय समित्या आणि अभ्यासगट बालभारतीकडून बरखास्त!

नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज- अजित पवार

मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण…- सुनिल गावसकर

चंद्रकांतदादा तुम्ही कोल्हापूरला या, जनता वाटच पाहत आहे- हसन मुश्रीफ

“धरणवीर उपमुख्यमंत्री जास्तच बोलू लागलेत, हिंमत असेल तर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या