नागपूर महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना प्रेझेंटेशन दिलं नाही, मात्र जयंत पाटलांना नक्की दाखवू!

नागपूर | आजवर उद्धव ठाकरेंना प्रेझेंटेशन दाखवले नाही मात्र जयंत पाटील यांना प्रेझेंटेशन नक्की दाखवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते नागपूर पावसाळी अधिवेशनात बोलत होते.

नाणार प्रकल्पाविषयी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना प्रेझेंटेशन दिले असेल, असं राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी म्हटलं होतं, त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंना प्रेझेंटेशन दिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नाणार प्रश्नी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करा अन्यथा सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-सिनेमागृहात बिनधास्त न्या बाहेरील खाद्यपदार्थ; राज्य सरकारची घोषणा

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या