बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील”

कोल्हापूर |  ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरु राहतील. या वाटचालीत राज्यकर्त्यांची सर्वतोपरी मदत ब्राह्मण समाजाला मिळत राहिल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत.

सर्व शाखीय ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन कोल्हापुरातील दसरा चौकात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालटांनी वरील वक्तव्य केलं आहे.

प्रत्येक समाजासमोर काही प्रश्न असतात. समाजाच्या विकासासाठी त्या समाजातील प्रमुख व्यक्तींनी पुढे येऊन कार्य करणे आवश्यक असते. मात्र, सध्या दुसऱ्या जातीचा द्वेष केला की आपल्या जातीचा नेता होतो, असंही पाटील म्हणाले आहेत.

आपला समाज बदलत आहे. आपला धर्म, आपली जात यामध्येच आपण गुंतून पडत आहोत. मात्र, देशासमोरील आर्थिक संकट बिकट आहे, त्याकडे लक्ष देणं अधिक महत्वाचं आहे, असंही ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुख्यमंत्र्यांना कोणी तरी समजवावे लागेल, संधी दिली तर मी समजावून सांगतो”

शरद पवारांनी राज ठाकरेंच्या मनसेबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाले….

महत्वाच्या बातम्या-

शरद पवार म्हणतात… ‘ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही’

इंदोरीकरांच्या वक्तव्याचा परिणाम; आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे संकेत

“इंदोरीकर चांगले कीर्तनकार, मी दोनवेळा त्यांना कीर्तनासाठी घेऊन गेलोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More