महामंडळाच्या तुकड्यासाठी नरेंद्र पाटलांनी पक्ष सोडला- जयंत पाटील

मुंबई | महामंडळाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पक्ष सोडला आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपला दलबदलूंचा पक्ष बनवू पाहत आहेत. नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीने आमदारकी दिली होती. मात्र आता महामंडळाच्या तुकड्यासाठी ते तिकडे गेले आहेत, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नरेंद्र पाटलांसारखे अनेकजण आहेत, ते हवा बदलली की परतीचा मार्ग धरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र पाटील यांचा राष्ट्रवादीला दे धक्का; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार!

-रसिका म्हणते, ‘शनाया’च्या भूमिकेत माझ्या व्यतिरिक्त कोणालाही पाहायचं नाही!

-धक्कादायक!!! दहीहंडी सोहळ्यात स्टेज कोसळलं; एकच खळबळ…

-गर्दी पाहून रंगात आले राम कदम; केलं अत्यंत धक्कादायक वक्तव्य…

-राहुल गांधी नव्हे लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवरच!