बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तेरे को का लगता था की नहीं लौटेंगे…’; जयंत पाटलांसाठी समर्थकांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. दोन आठवड्यानंतर जयंत पाटील यांनी कोरोनावर मात करून त्यांनी परत कामाला सुरूवात केली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थकांनी ते कोरोनामुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जयंत पाटील यांनी स्वतः रविवारी ट्विट करून आपण कोरोनामुक्त झालो आहे आणि नियमाप्रमाणे 14 दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करून विधानसभेत जाणार असल्याचं सांगितलं आहे. पाटील यांनी मुंबई महापालिका आणि शासकीय यंत्रणांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले आहेत. तसेच लोकांनी न घाबरता कोरोनाच्या चाचण्या करून घेणे आणि योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.

जयंत पाटील यांच्या समर्थकांनी ते कोरोनामुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. काही समर्थकांनी त्यांचा एक व्हिडिओ बनवून त्याला ‘टायगर जिंदा है’ असं नाव देत तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटेही काढण्यात आले आहेत कारण त्यामध्ये, फडणवीस यांचेही फोटो दाखवून नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या चित्रपटातील डायलॉग त्यात टाकण्यात आला आहे.

जयंत पाटील समर्थकांनी विनोद बुद्धीने केलेल्या या व्हिडिओचे राजकीय पडसादही उमटू शकतात. कारण नेहमीच एखाद्या राजकीय पक्षाने काही टीका केली तर दुसरा राजकीय पक्षाचे समर्थक त्याला तोडीस तोड उत्तर देण्यास तयार असतात. त्यामुळे, आता देवेंद्र फडणवीस समर्थक विरुद्ध जयंत पाटील समर्थक असा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा व्हिडिओ

थोडक्यात बातम्या

“कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल”

सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल

राफेलचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More