बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजप इतका जूना पक्ष की…’; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवासंवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) कोल्हापूरात होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटलांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपला पाच हजार वर्षांचा हिंदुत्वाचा इतिहास आहे, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांनी टोलेबाजी केली आहे.

भाजप इतका जूना पक्ष की पृथ्वीतलावर मानव जन्माला यायच्या आधीच त्याची स्थापना झाली होती असं म्हटलं तरी आम्हाला काही हरकत नाही, असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. तर 50 वर्षात तीन वेळा पक्षाची नावं बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.

भाजपचा (BJP) जन्म होऊन 50 वर्षेही झाली नाहीत. ज्यांना स्वत:चाच इतिहास माहिती नाही त्यांनी 10 हजार वर्षांपूर्वी असे म्हटले तरी काही फरक पडत नाही. लोकांचे मात्र चांगले मनोरंजन होते. त्यामुळे अशी वक्तव्ये करत राहा. आमचा कायमच पाठिंबा राहिल, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे काहीही बोलत राहतात. त्यांचं बोलणं किती गांभीर्यानं घ्यायचं हेच बघावं लागणार आहे. त्यांनी आता थोडी विश्रांती घ्यावी, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात, आता…

रशियाची मोठी खेळी, रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळणार?

राष्ट्रवादीच्या आमदाराकडूनच पक्षाला घरचा आहेर, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“राष्ट्रवादीच्या या ‘तुकडे तुकडे गँग’ला शरद पवारांनी सांभाळावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More