बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली म्हणजेच…’, जयंत पाटलांचा खोचक टोला

मुंबई | 2024 साली भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता असणार, असं वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरमध्ये बोलताना केलं होतं. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ती ताकद पाहायला मिळेल, असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली म्हणजेच 2024 पर्यंत महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करेल, असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे.

भाजप वारंवार सरकार पाडण्याचे दावे करत आहे. पण आज फडणवीसांनी पहिल्यांदा मान्य केलं की सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं वक्तव्य पाटलांनी केलं. तर मी महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशी टोलेबाजी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मंत्रिपदाबाबत मुंबईत राष्ट्रवादीची (NCP) बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी त्यांच्या शैलीत भाजपवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

आनंद महिंद्रांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, वाचा नेमकं कारण काय?

नवाब मलिकांना सोडविण्यसाठी मागितली ‘इतक्या’ कोटींची लाच, मलिकांच्या मुलाचा धक्कादायक खुलासा

“महाराष्ट्रातही आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही”

चहा महागला! आता ‘इतक्या’ रुपयांना मिळणार चहा, वाचा नवे दर

ऑनलाईन क्लासेसचे लहान मुलांवर होतायेत दुष्परिणाम, तज्ज्ञांनी सुचवले ‘हे’ उपाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More