Top News महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे; जयंत पाटलांची मोदींवर सडकून टीका

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक फैलावू नये त्यासाठी देशभर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आज मध्यरात्रीपासून येत्या 14 एप्रिलपर्यंत हे लॉकडाऊन राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मोदींच्या देशवासियांना उद्देशून केलेल्या संबोधनाचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, अशी टीका करत सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, असं मत त्यांनी मांडलं आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात कोणत्याही बाबींची सविस्तर स्पष्टता दिलेली नाही. देशभर अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोक सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणावर किराणा मालाच्या दुकानांकडे धाव घेऊन साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वाच्य नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने देशात अनागोंदी निर्माण झाली आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही, अशा शब्दात त्यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे.

तसंच महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध आहे, असाही विश्वास त्यांनी महाारष्ट्रातील जनतेला दिला आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”

महत्वाच्या बातम्या-

घाबरू नका, माझं मोदींशी बोलणं झालंय; जीवनावश्यक गोष्टी सुरू राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरद पवारांनी ‘बुद्धी’बळावर लेकीला आणि नातीला हरवलं; चाणाक्ष साहेबांनी इथंही थांगपत्ता लागू दिला नाही…!

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी 15 हजार कोटींचं पॅकेज- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या