मुंबई | भाजप ज्यांचा बाप काढतंय त्यांनी मनात आणलं तर मुंबईत फिरणं अशक्य होईल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप नेते आशिष शेलारांना दिला आहे. आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यावर ऐकेरी शब्दांत टीका केली. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा घणाघात आशिष शेलारांनी केला होता. यावरून जयंत पाटील यांनी आशिष शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
भाजपनं इतकं घसरण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांना आशा होती. ती पूर्ण झाली नाही. म्हणून भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणलं तर यांना मुंबईत फिरणं देखील अशक्य होईल. मात्र इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपनं आत्मचिंतन करावं, असं जयंत पाटील म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
मनसेच्या मोर्चाला परवानगी देणार का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…
माझ्या भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो- आशिष शेलार
महत्वाच्या बातम्या-
बापाचं नाव एकदा नाही 100 वेळा काढू..; निलेश राणेंचं उदय सामंतांना प्रत्युत्तर
मतांच्या राजकारणासाठी काहीही खपवून घेऊ नका- देवेंद्र फडणवीस
नियुक्तीसाठी मराठा तरूणांचं धरणं आंदोलन; सुप्रिया सुळे आझाद मैदानावर
Comments are closed.