Top News महाराष्ट्र सांगली

“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”

Photo Credit- Facebook/ Chandrakant Patil & Jayant Patil

सांगली | जेजूरी येथे उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. याप्रकरणातून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहचला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदरणीय शरद पवार साहेबांविषयी बोलण्याचे उद्योग बंद करावेत. आपण विरोधी पक्षात आहात, रितसर बोलायला आमची काही तक्रार नाही. पण चुकीचं बोलणाऱ्यांचं अप्रत्यक्ष समर्थन करणं बरोबर नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत दादांना सध्या त्यांचा पक्ष टिकवण्याची चिंता सतावत आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधानं होणं स्वाभाविक आहे, असा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते. पुण्यातल्या एका चांगलं काम करणाऱ्या महिलेने उभारलेल्या मतदारसंघात जाऊन तिथून निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?, असा सवालही जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना विचारलाय.

दरम्यान, शरद पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात वाद झाला होता.

थोडक्यात बातम्या-

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

डीजीपींनी नोकरी सोडत घेतला शेती करण्याचा निर्णय

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या