“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”
सांगली | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत तसेच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
पुण्यातील आयोजित एका सत्कार समारंभात चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच त्यांनी या संबंधी आता स्पष्टीकरण देत सारवासारवही केली आहे. पण यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे.
‘सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो तर, कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं नेमकं काय झालंय?, याचं संशोधन करावं लागेल’, अशी खरमरीत टीका जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे. तसेच चंद्रकांत पाटलांनी आपण कायमच शरद पवारांचा आदर करत आलो आहोत, असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, आपण शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्यामुळे खासगी कार्यक्रमात त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख केला असावा, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. त्यामुळे या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आणखी कोणत्या थराला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव
रिझर्व बँकेची एसबीआयवर मोठी कारवाई, ठोठावला तब्बल एवढा दंड
राज्यात आणि देशात काॅंग्रेस सक्षम पर्याय! नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
पाणीपुरी खवय्यांसाठी खुशखबर! पाणीपुरी खाल्ल्यानं होतो आरोग्याला फायदा
अन् चक्क मंत्र्यांचा हरवलेला चश्मा सापडला महिला उमेदवाराच्या केसात, पाहा व्हिडीओ
Comments are closed.