बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् जयंत पाटलांनी पुर्ण केली ‘त्या’ 6 वर्षाच्या चिमुकल्याची इच्छा

सांगली | जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सांगलीतल्या वाळवा तालुक्यातील आष्टा ते दुधगाव रस्ता, येेडेनिपाणी ते बावची रस्ता, बागणी- ढवळी – बहादुरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव रस्ता आणि दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादुरवाडी फाटा रस्त्यासह विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. त्यावेळी त्यांनी एका चिमुकल्याची इच्छा पुर्ण केल्यानं जयंत पाटील यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

वाळवा तालुक्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान 6 वर्षाचा संचित गावडे नावाचा लहान मुलगा उपस्थित होता. गावातील जेष्ठ नागरिक नारळ फोडताना पाहून संचितला नवल वाटलं. संचितने मोठी हिंमत करून मी नारळ फोडू का? अशी इच्छा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संचितची लगेच इच्छा पूर्ण केली.

संचितच्या हातात नारळ दिला आणि फोड नारळ, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी संचितची नारळ फोडण्याच्या इच्छेसह कार्यक्रमाचा शुभारंभ देखील झाला. संचितची इच्छा पूर्ण करत मंत्री जयंत पाटील यांनी सर्वच वाळवाकरांची मने जिंकली आहेत. जयंत पाटील यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर मोठं कौतूक होताना दिसत आहे.

दरम्यान, इस्लामपूर मतदारसंघात मंत्री जयंत पाटील यांनी 41 कोटींच्या विकास कामांची घोषणा केली होती. त्यावेळी 41 कोटींच्या विकास कामातील 23 कोटींच्या विकास कामांचा जयंत पाटील यांनी आज इस्लामपूर शुभारंभ केला. जयंत पाटील यांनी आपल्या मतदार संघातील रस्त्यांचे उद्घाटन करताना म्हणाले की, नागरिकांना कसलाही टोल न भरता प्रवास करता येणार आहे.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर

नदीच्या प्रवाहात अडकला मुलगा, तरूणीने केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ चुका टाळव्यात, अन्यथा गमवाल आपले प्राण!!

“मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणंच बाकी ठेवलंय”

61 वर्षाच्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी अन्….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More