बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रीमंडळाच्या भर बैठकीत जयंत पाटील संतापले, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही बैठक एका वेगळ्याच मुद्यावरून चर्चेत राहिली. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील चांगलेच संतापलेले दिसले.

मंत्रीमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे मिनिटस मंजूर करण्यात आले होते. परंतू असं असताना ती फाईल वित्त विभागाकडे पाठवल्यानं जयंत पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीमंडळाकडून जलसंपदा विभागाच्या कामांची फाईल मंजूर झाली असताना देखील मुख्य सचिवांनी पुन्हा एकदा वित्त विभागाकडे पाठवली होती. त्यामुळे जयंत पाटील नाराज झाले.

त्याचबरोबर मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या गोष्टी अशा अचानक बदलत असतील तर, मंत्रीमंडळाच्या वर कोण आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. असं असेल तर मग जलसंपदा विभागाच बंद करून टाका, अशा कडक शब्दात जयंत पाटलांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुनावलं. त्यामुळे या बैठकीत काही काळ शांतता पसरली.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या राजशिष्टाचार विभागाकरिता प्रबंधक आणि मुख्य न्यायमूर्ती यांचे अतिरिक्त प्रधान सचिव ही पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या आधीही मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय मुख्य सचिवांनी बदलला असल्यानं जयंत पाटील जास्त नाराज झाले होते.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाकडून डाॅक्टरला मारहाण ; पाहा व्हिडीओ

‘प्राण जाये पर शान ना जाये’; कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना असा होतोय तंबाखू आणि गुटख्याचा पुरवठा

‘पीएम केअरचा पैसा बाहेर काढा’; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुलं पत्र

‘…म्हणून भारतात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी सांगितलं कारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे 6 मोठे निर्णय; पाहा एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More