बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

सोलापूर | देशात 2024 च्या पंतप्रधानपदावरून विरोधी पक्षांमध्ये मतभेद दिसत आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे देशात राजकारणाबाबत विरोधी पक्षांमध्ये साशंका निर्माण झाली आहेत. अशातच आता राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काँग्रेसशी जवळीक साधत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वाटेगाव येथील कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते.

देशातील गरीब सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेऊन पंडित नेहरूंनी देश उभा केला. मात्र आज देशातील सार्वजनिक मालमत्ता विकून खासगीकरणाकडे मोदी सरकारने वाटचाल सुरू केली आहे. देशातील चार-पाच लोकांना या मालमत्ता विकून देश चालवता येईल, अशी त्यांची मानसिकता आहे. खंर तर काॅंग्रेसच्या काळातील कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेची आठवण देशात राहू न देण्याची मोदी सरकारची मानसिकता झाली आहे, अशी जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

देशातील सध्याचे राज्यकर्ते स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या त्यांनी अमेरिका आणि युरोपधार्जिण्या, तसेच देशातील हातावर मोजण्या इतक्या लोकांना मोठे करण्याचा उद्योग करत आहेत. यामधून देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूला तिलांजली देण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहेत, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान,  आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक पक्ष यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत.  तर राज्यात देखील निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपाचा पाढा वाचला जाण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘काॅंग्रेसनेच दहशतवादाला जन्माला घातलं’; योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर जहरी टीका

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून तब्बल ‘इतक्या’ कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

कुंभाराने बनवलेल्या मटक्याने सर्वांचीच झाली पंचायत, आता सारं गाव…, पाहा व्हिडीओ

कोरोना काळात रक्ताचा मोठा तुटवडा, टाटा रुग्णालयाने केलं महत्त्वाचं आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More