मुंबई | खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीची चर्चा झाल्या मात्र अंतिम खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडील अर्थखातं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबदल्यात जयंत पाटलांना जलसंपदा मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना अर्थ आणि नियोजन मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिलीप वळसे पाटलांकडे कौशल्यविकास, नवाब मलिकांकडे अल्पसंखांक्य, हसन मुश्रीफ यांच्याकडे सहकार खातं, धनंजन मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विकास तर जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खातं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीमहत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या खातेवाटपाच्या याद्या तयार आहेत, असं तिन्हीही पक्षाकडून सांगण्यात आलंय. मग खातेवाटपाचं घोडं नेमकं कुठं अडलंय?, हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
महत्वाच्या बातम्या-
“लष्कर हे राजकारणापासून दूर, सत्ताधाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो” – https://t.co/1w3Py5feV9 #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
तानाजी सावंतांच्या मंत्रिपदासाठी मातोश्रीपर्यंत दंडवत घालणार! – https://t.co/Fz8UsDB4Rh @ShivSena @uddhavthackeray #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
“देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही” – https://t.co/wfNcKgXQAt @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.