बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपापली मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा”

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पावसाने झोडपलं आहे. या तीन जिल्ह्यात सध्या पूरस्थिती आहे. नद्यांच्या पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

मला जाणीव आहे, आपल्या सर्वांची मोठी आबाळ होईल पण निसर्गापुढे आपण काहीच करू शकत नाही. सांगलीतही परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तिथल्या प्रशासनालाही ताबडतोब हालचाली कराण्याचा सुचना दिल्या आहेत. धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

आपापली मुलंबाळं, जनावरं व महत्त्वाच्या वस्तू घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खुप आहे. त्यामुळे काठावरच्या गावांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावं. पश्चिम महाराष्ट्राने असे अनेक संकट पाहिले आहे. आपण या संकटालाही तोंड देऊ, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता तुमच्या कौशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का?”

राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

साखर झोपेत असताना कोसळली इमारत; दुर्घटनेत 3 ठार तर 7 जखमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; भिडे पूल पाण्याखाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More