महाराष्ट्र मुंबई

दुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लवकर निर्णय घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे.

राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना आम्ही 9 एप्रिल रोजी पत्र पाठवल होतं. विधानपरिषदेच्या ज्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या त्यासंदर्भात ते पत्र होतं. आम्हाला राज्यपालांकडून कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे, काल पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊन आम्ही स्मरणपत्र पाठवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचं शिफारस पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलंय.

राज्याच्या मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे, त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली. राज्यपालांनी यावर विचार करतो असं सांगितलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, आम्ही आता कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. यासंदर्भात लवकरच राज्यपाल कायदेशीर निर्णय घेतील. राज्यात स्थिर सरकार असायला हवं. आम्ही सध्या मुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्यात गुंतलेलो आहोत, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

“कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी किम जोंग उन लांब राहतायत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या