मुख्यमंत्री नारायण राणेंसोबत डबल गेम खेळत आहेत!

सांगली | मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेसोबत डबल गेम खेळत आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय. हिवाळी अधिवेशनानंतर इस्लामपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री नारायण राणेंना लवकरच मंत्रिमंडळात घेण्याचं आश्वासन देतात तर दुसरीकडे राणेंना मंत्रिमंडळात घेणार नाही, असं शिवसेनेला सांगतात, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. 

दरम्यान, राणे मंत्री झाल्यानंतरही सेना सत्तेत राहिली तर त्यांचं चांगलंच घोंगडं अडकलेलं आहे, असं म्हणावं लागेल, असंही ते म्हणाले.