…म्हणून शाहरुखवर संतापलो, शेकाप आमदार जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई | शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी अभिनेता शाहरुख खानला सुनावल्याचा व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला होेता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. 

“मी अलिबागला निघालो तेव्हा ‘गेट वे ऑफ इंडिया’वर शाहरुख आला होता. प्रचंड गर्दी होती. पोलीस लोकांना मागे रेटत होते. मलाही त्यांनी मागे रेटलं. तिथल्या एका पोलिसानं मला ओळखल्यानंतर त्याने मला जाऊ दिलं.”

दरम्यान,  “शाहरुख बोटीत निवांत सिगारेट ओढत बसला होता. लोक खोळंबले असताना टाईमपास करणाऱ्या शाहरुखचं वर्तन चुकीचं वाटल्यानं त्याला फटकारलं,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.