Top News राजकारण

शरद पवार आमचे कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना देण्याचा त्यांना अधिकार- जयंत पाटील

पुणे | सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या कुटूंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही.”

शरद पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर नातवाला फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली. शिवाय पार्थ पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

“या बैठकीत पार्थ पवार यांच्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवार कुटुंबीय यांच्यात कोणताही वाद नाही.” असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या कडवट टीकेवर पार्थ पवार यांची अतिशय सायलेंट प्रतिक्रिया…!

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात दीड हजारांहून जास्त रुग्ण आढळले!

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या