सांगली | जनतेला भेटवस्तू देऊन निवडणूक जिंकू शकतो, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये दिसत आहे. यामुळं मला त्यांचं कौतुक वाटतं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
सांगली वसंतदादांची आहे. येथील जनता छोट्या-छोट्या भेटवस्तूंना बळी पडणारी नाही, येथे धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देणारी जनता आहे, त्यामुळे महापालिकेत जनता भाजपचा शिरकाव होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील आता जयंत पाटलांना काय प्रत्युत्तर देतील?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नितीन गडकरी पंतप्रधानपदाचं मटेरिअल- पृथ्वीराज चव्हाण
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या; निलंबन करण्याची मागणी
-…अखेर अमित राज ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाचा मुहूर्त ठरला?
-संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…
-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन