बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?”

पंढरपूर | भाजप आणि राष्ट्रवादीने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी जोरदार दंड थोपटले आहे. दोन्ही पक्षाचे नेते जोरदार प्रचारसभा घेत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनी मी या सरकारचा कार्यक्रम करतो, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा जोरदार समाचार घेतला आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे, असं भाजप म्हणतंय. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?, असा सवाल जयंत पाटील यांनी भाजपला विचारला. पंढरपूर-मंगळवेढाची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

विठ्ठल – रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न, कारखान्यांचे प्रश्न, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या, असं आवाहनही जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढाकरांना केलं आहे.

दरम्यान, पंढरपुर-मंगळवेढा पोटनिवडणूक आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. देवेेंद्र फडणवीस, अजित पवार, जयंत पाटील यांसारखे दिग्गज नेते पंढरपुरात जिंकण्यासाठी जोर लावताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं”

कोहलीनं शाहबाज अहमदला चेंडू सोपवला अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

उस्मानाबादेत एकाशेजारी एक 19 चिता पेटल्या, जागा कमी पडल्यानं 8 अंत्यसंस्कार उद्या

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात गारपिटीमुळे गारांचा खच, विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More